Book Review # 100 : Asa Mi Asa Mi : P L Deshpande



तुळशीवृंदावनापासून ते कॅक्टसच्या कुंडीपर्यंत कळत न कळत काळाबरोबर वाहत वाहत गेलेल्या एका कारकूनाचे हे आत्मचरित्र आहे. निरनिराळ्या मासिकांतून
त्यातला बराचसा भाग यापूर्वीच आला आहे. मुख्यत: ‘दीपावली’च्या दिवाळी अंकांतून ‘असा मी असामी’ व 
त्यानंतर ‘पुन्हा मी पुन्हा मी’ असे दोन भाग प्रसिद्ध झाले होते. 
ह्या काल्पनिक आत्मचित्राचा नायक माझ्या मनात अनेक वर्षे घर करून बसला आहे. निरनिराळ्या लेखांतून तो डोकावतो. 
त्याला मी इथे ह्या पुस्तकात पकडून ठेवला तरी माझ्या मनातले घर सोडायला तो तयार नाही. 
ह्या अफाट मुंबई शहरातल्या ज्या मध्यमवर्गीय समाजात मी वाढलो त्यातलाच हा एक! 
कुठल्यातरी हपिसासाठी जगायचे आणि पेन्शनीसाठी किंवा प्राविडंट फंडाकडे डोळे लावून दिवसादिवसाने म्हातारे. 



१०० म्हणजे एक टप्पा . जेव्हा लिहायला सुरुवात केली पुस्तकांबद्दल मला जे वाटतं ते तेव्हा वाटलं नव्हत एवढी मजल गाठेन म्हणून. 
पण आज जेव्हा मागे वळून पहाते तेव्हा जाणवतं आपण या प्रवासात खूप पुढे आलोय.

खूप शिकायला मिळालं , खूप वाचायला मिळालं , खूप अनुभव 'लेखकाच्या दृष्टीकोनातून समजायला मिळालं .

पण या सगळ्यांची सुरुवात ज्या पुस्तकांतून झालं,त्या लेखकाबद्दल आज खूप आवर्जून लिहावासा वाटतोय. 
मराठी साहित्य खर तर खूप खोल आणि दर्जेदार लेखनाचा खजिना आहे.

खूप महान लेखकांनी त्यांच्या लेखनांनी आपल्याला भुरळ पाडलीं त्यात माझ अत्यंत आवडता नाव आहे पु .ल देशपांडे
पल्या साध्या सरळ लेखनांनी त्यांनी जगात सगळ्यांना आपलासा केलाय. त्यांच्या खजिन्याचा एक हिरा म्हणजे 
"असा सा मी असामी".  एका साधं कुटुंबाचा चाळीतून फ्लॅट पर्यंतचा प्रवास अत्यंत सुंदर भाषेत केलाय . 
भारताच्या स्वतंत्रआधी पासून नंतर पर्यंत घडलेले बदल खूप सुंदररित्या मांडलाय. आज जेंव्हां १००रव्या पोस्ट लिहितेय 
खूप अवर्जून धन्यवाद पु लं ना . वाचनाचा नाद मला त्यांनी लावला. त्यांच्या पुस्तकांचा भाषांतर नाहीये  हे 
मराठी न वाचणाऱ्या लोकांच दुर्देव म्हणेन . 

या साध्या माणसाच्या या महान लिहिण्याला मानाचा मुजरा . 

Comments

Popular Posts